फैजपूर ते रोझोदा रस्ता डांबरीकरणाची मागणी


फैजपूर : फैजपूर येथून रोझोदा रस्त्यावरील सतपंथ पंथाच्या समाधी स्थळापासून ते रोझोदा शिवरस्तापर्यंत रस्ताच नसल्याने या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे करण्यात आली. दोन्ही रस्त्यांमधील अंतरावर किमान 1 कि.मी. खडीकरण व डांबरीकरण करून पुढील रोझोदा शिव रस्त्यापासून रोझोदा गावापर्यंत डांबरीकरण करून घ्यावे या मागणीसाठी फैजपूर व रोझोदा शिवारातील शेतकरी व नागरीकांनी आमदार चौधरी यांची भेट घेतली. 70 शेतकरी वर्गाने स्वाक्षर्‍यांचे रस्ता कामाबाबत निवेदन दिले.

रस्ता झाल्यास अंतर कमी होवून मिळणार दिलासा
रस्ता झाला तर दोन्ही गावातील अंतर कमी होईल त्यामुळे लोकांचा फैजपूर येण्या-जाण्याचा मार्ग सुखर होईल. आमदार शिरीष चौधरी रस्ता कामाबाबत दखल घेण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी फैजपूर येथील संदीप चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, योगेश नेमाडे, नितीन पाटील, नथू होले, तुषार राणे, कुंदन चौधरी, मधुकर चौधरी, रोझोदा येथील शेतकरी स्वप्नील वायकोळे, डिगंबर नेमाडे, पंडित भारंबे, होमकांत सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !