भुसावळ शहरात कोरोना लसीकरण शिबिर
भुसावळ : शहरातील ओ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान व प्रभाग क्रमांक सातच्या मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अष्टविनायक कॉलनी, रेल दुनियाजवळ तिसरा लसवंत मेळावा आयोजित करण्यात आला. शहरातील मिशन कवच कुंडले अभियानातून लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यावेळी ज्यांनी ज्यांनी दुसरा डोस घेतला त्यांना सर्टिफिकेट वाटण्यात आले. यावेळी पहिली व दुसरी लस देण्यात आली. दिवाळी उत्सवामुळे सध्या बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. दिवाळीपर्यंत बाजारात गर्दी कायम राहणार आहे. यामुळे कोरेाना संसर्गाचा धोकाही वाढला आहे. यासाठी मिशन कवच कुंडले अभिमान अंतर्गत लसवंत मेळावा ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला. प्रभागातील 165 नागरीकांनी लसीकरण करण्या आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ.मयूर नितीन चौधरी, समाजसेवक सतीतश सपकाळे, विशाल जंगले, प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.नितु पाटील, स्वप्नील सपकाळे, भूषण वराडे, तुषार कुरकुरे, किशोर शिंपी, नरेंद्र ठोसर, गोपाळ सपकाळे, गोकुळ सोनवणे, अजय सपकाळे, चेतन सावकारे, तुषार कुरकुरे, मयूर सपकाळे, उमेश कचवे, वरूण पाटील, भूषण वराडे यांनी उपक्रम यशस्वीसाठी परीश्रम घेतले. यावेळी कुणाल जगताप, उषा गायकवाड, कोमल तायडे, सोनाली बाविस्कर तसेच सर्व प्रभाग 7 मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.



