कोरोना योद्धा पुरस्काराने संदीप सावळे यांचा सन्मान


रावेर : कोरोना काळात अनेक रुग्णाचे प्राण वाचवले विाय त्यांना वेळेत उपचार मिळवून दिल्याबद्दल रावेर पंचायत समिती उपसभापती धनश्री सावळे यांचे पती तथा भाजपा युवा कार्यकर्ते संदीप सावळे यांचा अहिरवाडी जागृती मित्र मंडळातर्फे सत्कार करून कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केर्‍हाळा गणातील व रावेर तालुक्यातील रुग्णांवर वेळेत उपचार केल्याने जागृती मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संदीप सावळे यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला. कोरोना काळात संदीप सावळे यांनी अहिरवाडी परीसरातील रुग्णावर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका वठवल्याने या कार्याची दखल घेण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच सुनीता नागेश्वर चौधरी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी लक्ष्मण महाजन, माजी सरपंच गोविंद आनंदा चौधरी, माजी सरपंच राहुल प्रकाश चौधरी, युवराज चौधरी, माजी उपसरपंच गोपाल चौधरी, गोकुळ चौधरी, राजू चौधरी, कडू चौधरी, सुरज फेगडे, आकाश सोनवणे, महेंद्र महाजन, नितीन महाजन, शाहरुख तडवी, पंकज महाजन, शुभम चौधरी, विश्व मराठे, दिनेश महाजन, सचिन चौधरी, मुरलीधर पाटील, राजू बेंडाळे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, डॉ.धर्मेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते..





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !