बॅरीस्टर ओवेसी म्हणाले : एमआयएम पक्ष राज्यातील सर्व निवडणुका लढणार


औरंगाबाद : मुंबई महापालिकेसह राज्यात आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुका एमआयएम लढणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह इतर अनेकांशी युतीचे पर्याय खुले असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा बॅ.असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची खुलताबाद येथे 30 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो. त्यांची कोणीतरी दिशाभूल केली. विधानसभेला त्यांनी युती तोडली. आम्ही नाही पण यापुढील निवडणुकीत युतीचा पर्याय आहे. ज्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आमच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पाडली असे वक्तव्य करतात त्यांच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादीची युती आहे. त्यावरून या दोन पक्षांची विचारधारा कळते. त्यांना फक्त मुस्लिमांची मते हवी असतात. त्यांना मुस्लिमांची काळजी असेल तर त्यांनी 5 टक्के आरक्षण द्यावे तसेच आता केंद्र सरकारने संविधानात संशोधन करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी असे ते म्हणाले.

मुंबईत 27 रोजी मोर्चा
मुस्लिमांना 5% आरक्षणासह विविध मागण्यांसाठी 27 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आपापल्या वाहनांवर तिरंगा झेंडा लावून मोर्चात सहभागी होतील, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.



खासदार इम्तियाज मेगा स्टार
आर्यन खानच काय कोणत्याही स्टारविषयी मला काहीही बोलायचे नाही, असे सांगत ओवेसी म्हणाले की, आमच्यासाठी माजी आमदार वारिस पठाण, आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल मालेगाव, आमदार फारूख शाह स्टार तर खासदार इम्तियाज जलाल मेगा स्टार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !