भुसावळातील धावपटूंनी दिला एकात्मतेचा संदेश
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम
भुसावळ : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीचे औचित्य साधून शहरातील स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रविवारी सकाळी रन फॉर युनिटचे आयोजन करण्यात आले. पहाटे सहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावपटूंनी धावायला सुरुवात केली. याप्रसंगी प्रवीण फालक यांनी सर्व धावपटूंना या रनचे महत्त्व सांगितले. जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिर व तेथून परत येऊन पांडुरंग टॉकीज, दगडी पूल, सरदार पटेल पुतळा ते यावल रोडमार्गे पुन्हा मैदान असे चार किलोमीटर अंतर धावून सर्व धावपटूंनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
शहरवासीयांनी वाढवला उत्साह
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. ठिकठिकाणी शहरातील नागरीक व प्रवाशांनी धावपटूंचा उत्साह वाढवला. रनमध्ये पोलीस विभागातील भाऊसाहेब पाटील, संजय भदाणे यांनी सहभाग नोंदवला. या रनचे नेतृत्व पौरवी गरुडे व रीया पुरलकर या बाल धावपटूंनी केले. या रनमध्ये डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, पूनम भंगाळे, प्रिया पाटील, संजीवनी लाहोटी, नीलांबरी शिंदे, भावना झा, डॉ.शीतल चोरडीया, कृपा मूलचंदानी, प्रांजली झा, स्नेहल महाजन, मिनी जोसेफ या महिला धावपटूंनी सहभाग नोंदविला. सन्मित चोरडिया, छोटू गवळी, हर्षल लोखंडे, सारंग चौधरी, माधव गरुडे, संदीपकुमार वर्मा, आनंद सपकाळे, अक्षय नारखेडे, विजय मोहनानी, अमित बत्रा, युवराज परदेशी, रामचंद्र झोपे, मनीष वारके, कैलास काबरा, प्रकाश अटवाणी, राजेंद्र ठाकूर, निर्मल बलके, सुनील सोनगीरे, अखिलेश कनोजिया, सागर मुलचंदानी, विलास पाटील, रंजीत खरारे, प्रवीण वारके, गणसिंग पाटील, ब्रिजेश लाहोटी, अंकित पोद्दार, निलेश लाहोटी, श्रीकांत नगरनाईक, महेंद्र पाटील, प्रवीण पाटील यांनी देखील यशस्वी सहभाग नोंदविला.



