भुसावळात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात
भुसावळ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन : दिवसभरात सरदार पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी उसळली गर्दी
भुसावळ : भुसावळ शहर व परीसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिर, रन फॉर युनिटी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. दरम्यान, भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमेटी
शहरातील नसरवांजी फाईल भागातील राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालयात जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान व जिल्हा उपाध्यक्ष जे.बी.कोटेचा यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी शहराध्यक्ष सलीम गवळी, शहर सचिव शे.हमीद, डॉ.नईम मझहर, महिला शहराध्यक्ष यास्मीन शेख, महिला काँग्रेस उपाध्यक्ष हमीदा गवळी, यास्मीन बानो, सायरा बानो, शमीम कुरेशी, महेरून सैय्यद, शीला ईदर परदेशीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



नारखेडे इंग्लिश मेडियम स्कूल
शारदा नगरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे सेक्रटरी पी.व्ही. पाटील यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. प्रसंगी संस्थेचे ऑनररी जॉइंट सेक्रटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी उपस्थित होत्या. शाळेच्या शिक्षिका वंदना कोल्हे, शबनम तडवी यांनी वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे, संस्थेचे चेअरमन श्रीनिवास एन.नारखेडे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल कुलकर्णी व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
देविदास नामदेव भोळे महाविद्यालय
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देश एकसंघ रहावा म्हणून सरदार पटेल यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होत. अत्यंत कणखरपणे काही भूमिका घेतल्यामुळे त्यांना लोहपुरुष असे संबोधले जाते. प्रास्ताविक प्रा.डॉ.जी.पी.वाघळदे यांनी तर सूत्रसंचालन तर आभार प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मानले. प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रकाश चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
