मनुदेवी येथे विकासकामांचे भूमिपूजन
यावल : तालुक्यातील मनुदेवी येथे भक्त निवास बांधण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन आमदार लता सोनवणे यांच्याहस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. या विकासकामाच्या माध्यमातून खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनुदेवी मातेच्या दर्शनास येणार्या भक्तांची भक्तनिवास बांधकामानंतर निवासाची मोठी सोय होणार आहे. या अनुषंगाने पर्यटन विकास होऊन परीसरात लहानमोठ्या उद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मनोगतात सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील (चोपडा), यावल तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, आडगाव सरपंच अमीना तडवी, उपसरपंच प्रतिभा पाटील, सुवर्णा पाटील, गोटू सोनवणे, सुभाष अप्पा साळुंके, दिनेश साळुंके, सुधाकर पाटील, नितीन पाटील, निलेश साळुंके, दीपक कोळी, हरी कोळी, भास्कर पाटील, शांताराम पाटील, प्रकाश कोळी, विनायक पाटील, रशीद तडवी, योगेश पाटील, सूर्यभान पाटील, राजू तडवी, पटवारी आबा, आत्माराम पाटील, संजय कोळी, आशिष झुरकाळे, विनायक अप्पा पाटील, पुंडलिक पाटील, युवराज पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, रवींद्र पाटील, गोरख पाटील, संजय कोळी, सीताराम साळुंखे, जीवन वाणी, मोहन न्हावी, सचिन पाटील, सुनील पाटील, सिकंदर तडवी, शशिकांत शिंदे, संजय कोळी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.



