गरजू महिलेला आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आर्थिक मदतीचा हात


कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर : येथूनच जवळ असलेल्या सुळे गावातील एका गरीब महिलेचे अतिवृष्टीमुळे घर पडले. या महिलेला आर्थिक मदत म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंधरा हजारांचा धनादेश देऊन आर्थिक आधार दिला. सुळे येथील गरीब कुटुंबातील उर्मिला देविदास खोरवाडे यांना कुणाचाही सहारा नसल्याने त्या एकट्याच राहतात. गत महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महिलेचे घर पडले. सुळे गावातील शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना माहिती दिल्यानंतर रविवार, 31 ऑक्टोबर रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उप तालुका प्रमुख नवनीत पाटील यांच्याकडे धनादेश दिल्यानंतर तो महिलेला देण्यात आला. यावेळी कुर्‍हा शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव, जि.प.गटप्रमुख विनोद पाटील, सतीश नागरे, नितीन कासार, अकबर ठेकेदार, शैलेश पाटील, संदीप ढिवरे, दत्ता पाटील व सुळे ग्रामस्थ उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !