वरणगावात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात
वरणगाव : शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी आर.आर.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सुनील काळे, गोलू राणे, नटराज चौधरी, अशोक धुमाळे, विलास तायडे, जगन्नाथ चौधरी, झोपे, भंगाळे, डॉ.सादीक साबीर कुरेशी, मुस्लिम अन्सारी, मिलिंद भैसे, किरण धुंदे, प्रभाकर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष सुनील काळे आपल्या मनोगतात म्हणाले की, वरणगावात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी दखल घेण्यात येईल. सूत्रसंचालन मिलिंद भैसे यांनी. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाकर मराठे, मयूर गावडे, शंकर पवार, आकाश निमकर, रमेश पालवे, मयूर गावंडे, आकाश निमकर, संदीप माळी, विवेक कुलकर्णी, छगन पवार, नेहते, केशव भंगाळे, योगेश चौधरी, संदीप माळी, पप्पू ठाकरे, किशोर सोनार, कमलाकर मराठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
