गुन्हेगारीला गुडबाय करून समाजात चांगले जीवन जगा : पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे


भुसावळ : गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजासह कुटुंबातही बदनामी होते त्यामुळे सामाजिक जीवन जगताना अनेक अडचणी येतात त्यामुळे गुन्हेगारीला आता कायमस्वरुपी गुडबाय करून समाजाच्या प्रवाहात येवून चांगले जीवन व्यतीत करा, असा मौलीक सल्ला पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील हिस्ट्रीशीटरांना दिला. वाघचौरे म्हणाले, संसारात लक्ष घाला, मुलांना चांगले शिक्षण देऊन उच्च पदस्थ अधिकारी बनवा आणि गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब जा, गुन्हेगारी क्षेत्रात काहीही नाही, पोलिसांकडून वारंवार चौकशी होते, ते बंद करण्यासाठी समाजात राहून चांगले जीवन व्यतीत करावे, असेही ते म्हणाले. यावेळी 17 हिस्ट्रीसिटर उपस्थित होते. यावेळी बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे उपस्थित होते.

नवीन गुन्हेगारांची माहिती द्यावी
यावेळी हिस्ट्रीशीटर नेमके काय काम करतात, कुठे राहतात, नव्याने काही गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती घेण्यात आली.
समाजात वावरतांना गुन्हेगार म्हणून वावरू नका, आतापर्यत जे केले ते जाऊ द्या, चांगले वर्तन करा, समाजकार्य करा, दादागिरी करू नका, समाजात चांगले वावरा, असे आवाहन डीवायएसपी वाघचौरे यांनी केले. शहरात होणार्‍या चोर्‍या, मारामार्‍यामुळे तुमचेही नाव समोर येऊ शकते, त्यामुळे नवीन नवीन गुन्हेगार येत आहे, त्यांची काही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !