लायटींग लावताना शॉक लागल्याने पतीचा मृत्यू : पत्नीसह मुले गंभीर


सातारा : वीज वितरणच्या मुख्य लाइनला हात लागल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला तर पतीला वाचविताना पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले गंभीररीत्या भाजून जखमी झाली. ही दुर्देवी घटना सातार्‍यातील मोरे कॉलनीत शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दिवाळीच्या सणानिमित्त घरावर लाईटींगच्या माळा लावताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. सुनील तुकाराम पवार (वय 42) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून मनीषा पवार आणि त्यांची दोन मुले श्रवण आणि ओम हे दोघेही गंभीररीत्या भाजून जखमी झाली आहेत.

उपचारापूर्वीच पतीचा मृत्यू
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरीकांनी त्यांना तत्काळ सातार्‍यातील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच सुनील पवार यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकार्‍यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करत होते. ऐन दिवाळीच्या सणातच पवार कुटुंबावर ओढावलेल्या संकटामुळे सातार्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.









 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !