कोळवदला 17 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न


यावल : तालुक्यातील कोळवद येथील 17 वर्षीय मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार, 6 रोजी सकाळी उघडकीस आली. मुलीवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती आता स्थिर आहे. कोळवद (ता.यावल) येथील 17 वर्षीय मुलीने शनिवारी सकाळी संतापाच्या भरात घरातील विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, अधिपरीचारिका जॉन्सन सोरटे आदींनी प्रथमोपचार केले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !