अंतर्नादतर्फे सातपुड्यात फराळासह नवीन कपडे वाटप


सातपुड्यातील डोंगरदे येथे राबविला उपक्रम : वंचितांचे चेहर्‍यावर फुलले हास्य

भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील डोंगरदे येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात 200 कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, स्वेटर, शैक्षणिक साहित्य, तांदूळ, पणत्या, बिस्किट, चॉकलेट आणि नवीन चपला, बुट यांचे वाटप करण्यात आले. दीपोत्सवाच्या निमित्ताने अंतर्नादतर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गोड करू या’ असे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत गोळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष होते.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे समन्वयक प्रदीप सोनवणे, तर सह समन्वयक समाधान जाधव, अमित चौधरी हे होते. श्रीकांत जोशी, ज्ञानेश्वर घुले, जीवन महाजन, मेहरबान तडवी, संजय भटकर, देव सरकटे, प्रसन्ना बोरोले, आरीफ तडवी, गणेश जावळे, जीवन महाजन, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, भूषण झोपे, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हरीश भट, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप रायभोळे, शैलेंद्र महाजन, रोहिदास सोनवणे, शशीकांत राणे, रमेश गाजरे, हेमंत बोरोले, दीपक जावळे, प्रमोद पाटील, जयंत चौधरी, अमित नागराणी, मिलिंद राणे, सुशील पाटील, दीपक सोनवणे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.




चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उपक्रमाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ आणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जोरदार प्रतिसाद लाभले त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले आहे. भविष्यात हा उपक्रम लोकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रदीप सोनवणे, सह समन्वक समाधान जाधव, अमित चौधरी यांनी दिली. शहरी लोक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा आनंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !