भाजप नेते निलेश राणेंचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट : जळगाव जिल्ह्यात शिवसैनिक संतप्त


जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी भाजपचे नेते निलेश राणे यांनी आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील एका कार्यक्रमात ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायल्यानंतर राणे यांनी ट्वीट केले होते. दरम्यान, निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ठिकठिकाणी केली जात आहे.

प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळणार आहे. निलेश राणेंच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.



राणेंनी सोडली पातळी
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी कव्वाली गायन केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. नशिराबादमध्ये मंत्री गुलाबराव यांनी ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अजरामर कव्वाली गात आपल्यातील नवा हुनर त्यांनी दाखवून दिला. याच कव्वाली गायनावरून निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर पातळी सोडून टीका केली आहे. राणेंनी गुलाबराव पाटलांबद्दल बोलताना अत्यंत शिवराळ भाषा वापरली आहे. आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, असा चिमटाही राणे यांनी काढला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !