अंतुर्लीत दिव्यांगांना व्हील चेअरचे वाटप व गुणवंतांचा सत्कार


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे स्व.सीताराम शामराव पाटील-निकम, भागवत दादा यांच्या स्मरणार्थ मंगलमूर्ती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील उर्फ पिंटू भाऊ यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दिव्यांग बांधवांना 15 व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. पत्रकार, आरोग्य विभाग व गावातील खाजगी डॉक्टर तसेच आशा वर्कर तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्प देऊन आमदार चंद्रकांत पाटील व गावातील सरपंच सुलभा शिरतूरे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील, प्रमोद महाजन, मुन्ना पाटील यांची पूर्ण पुण्याहून आलेली टीम तसेच मुक्ताईनगर शिवसेना पदाधिकारी छोटू भाऊ, अफसर खान, राजूभाऊ, प्रवीण पाटील, संतोष मराठे तसेच काँग्रेसचे भोई, शरद महाजन, दिनेश पाटील, अनिल वाडीले, भैया शेख तसेच अंतुर्ली येथील शिवसेनेचे सुधीर कुलकर्णी मोहन बेलदार राजू सावकारे अन्वर खान व असंख्य कार्यकर्ते व नायगाव, पिंपरी नांदू, बेलसवाडी, धामंदे, भोकरी, करकी, बेलखेड, नरवेल, पातोंडी, या ठिकाणाहून दिव्यांग बांधव उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !