आदिवासी पाड्यावर फराळासह साडी वाटप


यावल : तालुक्यातील शिरसाड येथील युवा ग्रामपंचायत सदस्य तथा यावल तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाचे संचालक तेजस धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून भाऊबिजेच्या पूर्वसंध्येला गावाजवळील आदिवासी पाड्यावर जाऊन महिला भगिनींना फराळ व साडी वाटप करण्यात येतो. शिरसाड गावाला लागून असलेल्या दोन ते तीन पाड्यांवर जाऊन हा कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिरसाड येथील ज्येष्ठ नागरीक प्रताप नाना पाटील, पांडुरंग काका मराठे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश सोनवणे, वासुदेव सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, डिगू महाजन, प्रभाकर जाधव, विष्णू सोनवणे, किशोर बडगुजर, बापू पाटील, दीपक खंबायत, किशोर इंगळे, आबा ठाकूर, राहुल भालेराव, विकास वाघ, विशाल इंगळे, श्रीकृष्ण शिरोळे, लिलाधर धनगर, विकास अटवाल, सागर सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !