गावठी कट्टा बाळगला : शहाद्यात महिलेला अटक


शहादा : गावठी बनावटीचा कट्टा विक्रीसाठी आलेल्या महिलेला अटक करण्यात आली. शहादा शहरातील पोलीस लाईनसमोरील चष्मा विक्रीच्या दुकानात रविवार, 7 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान संशयीत सुरेखा उर्फे सांची गणेश गुजराथी ही महिला सहा हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा विक्रीसाठी आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी कट्टा जप्त केला आहे. नाईक मनीलाल दिलीप पाडवी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सुरेखा उर्फे सांची गणेश गुजराथी (रा.नितीन नगर , शहादा) हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास शाया राजपूत करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !