नावरे येथील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला


यावल : नावरे येथून शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह सोमवारी ग्रामपंचायतीच्या विहिरीत आढळला. नावरे, ता.यावल येथील सुनील भोजू मेढे (47) शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याने यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. सोमवारी ग्रामपंचायतीच्या वापर नसलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. याबाबत यावल पोलिसात उत्तम मेढे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !