एस.टी.कर्मचारी आंदोलनाला भुसावळात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा


भुसावळ : राज्यभर महाराष्ट्र राज्य परीवहन कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे.कर्मचार्‍याच्या संपास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पाठिंबा देण्यात आला आहे.

भुसावळ वंचित संघटनेचा संपाला पाठिंबा
परीवहन विभागास शासनाने सामावून घ्यावे म्हणून एस.टी.कर्मचारी आंदोलन करीत असून राज्यभर संप पुकारण्यात आला आहे. या संपास वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. हा पाठिंबा पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार देण्यात आला असल्याचे पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद सोनावणे यांनी सांगितले. एस.टी.कर्मचारी यांच्या मागण्या सरकारने तत्काळ मान्य कराव्यात, असे निवेदन ही आगारप्रमुखांना देण्यात आले.




यांची होती उपस्थिती
प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, जिल्हा कामगार सरचिटणीस बालाजी पठाडे, तालुकाध्यक्ष संतोष कोळी, शहराध्यक्ष गणेश जाधव, वंदना आराख, आशा सोनवणे, शोभा सोनवणे, गणेश इंगळे, रूपेश कुर्‍हाडे, देवदत्त मकासरे, किरण सावकारे, गणेश जाधव, प्रमोद शिरसाट व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !