अहमदनगर जिल्हा रुग्णालयात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू : जिल्हा शल्य चिकित्सकांसह चौघांचे निलंबन


अहमदनगर : 11 कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, दोन वैद्यकीय अधिकारी व एक स्टाफ नर्स यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी ट्विटद्वारे दिली आहे. आहे. दरम्यान, इतर दोन स्टाफ नर्सची सेवा समाप्त करण्यात आली. रविवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली तसेच घटनेची सर्व माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
टोपे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा यांच्याविरोधात तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. मात्र संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्येही आमदारांनी डॉ. पोखरणा यांच्याविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला होता. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.



यांच्यावर निलंबनाची कारवाई
डॉ. सुनील पोखरणा (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. सुरेश ढाकणे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. विशाखा शिंदे (वैद्यकीय अधिकारी), सपना पठारे (स्टाफ नर्स) तर आस्मा शेख (स्टाफ नर्स), चन्ना अनंत (स्टाफ नर्स) यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !