रावेरला गुरुवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


14 व 17 वर्षाआतील सब-ज्युनिअर गटासाठी कोल्हापूरात राज्यस्तरीय स्पर्धा

भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची आठवी 14 वर्षाच्या आतील व 19 वी 17 वर्षाआतील (सब-जुनियर) गटातील मुला/मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर येथे 18 ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी गुरूवार, 11 रोजी सरदार जी.जी. हायस्कूलच्या मैदानावर सरदार जी.जी.स्पोर्ट्स क्लबतर्फे दुपारी दोन वाजता होणार आहे. 14 वर्षासाठी 30 नोव्हेंबर 2007 व 17 वर्षासाठी 30 नोव्हेंबर 2004 नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, युवराज माळी, साजीद तडवी, अजय महाजन, प्रतीक खाराले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !