भुसावळ म्युन्सीपल हायस्कूलच्या नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार


भुसावळ : म्युन्सीपल हायस्कूलमध्ये नवनियुक्त मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परीषदेच्या वतीने जिल्हा नेते एस.एस.अहिरे व जिल्हाध्यक्ष गिरीश एस.नेमाडे, श्री कृष्ण हायस्कूल शिंदी येथील ज्येष्ठ शिक्षक भास्कर पी.वारके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण व शहरी भागात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना येणार्‍या अडचणी यासंदर्भात उपस्थित पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. राज्य क्रीडा महासंघाचे पदाधिकारी डॉ.प्रदीप साखरे यांनी मनोगत व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !