रामानुजन भारत गणित यात्रेचे आगमन : उद्या दीपनगरात भेट


भुसावळ : गणित विषयाबद्दलची भीती कमी व्हावी तसेच गणिताचा प्रचार व प्रसार संपूर्ण भारतभर व्हावा यासाठी भारताच्या स्वातंत्र्य अमृतवर्षाचे औचित्य यसाधून ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबच्या वतीने रामानुजन अमृत भारत गणित यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेचे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आगमन झाले आहे. तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील जळगाव जिल्हा येथील पाच शाळांना भेटी देत आहे. दम्यान, शुक्रवार, 12 नोव्हेंबर सकाळी 8 ते 12 श्री शारदा माध्यमिक विद्यालय, दीपनगर तर याच दिवशी दुपारी 1 ते 5 दरम्यान किन्ही येथील सर्वोदय हायस्कूल तसेच शनिवार, 13 नोव्हेंबर सकाळी आठ ते एक दरम्यान न.हं.राका विद्यालय, बोदवड व याचदिवशी दुपारी 2 ते 5 दरम्यान वरणगावातील महात्मा गांधी विद्यालयाला भेट देण्यात येईल. यानंतर 15 नोव्हेंबरला ही यात्रा पुढे कर्नाटक राज्यात जाणार आहे. यात्रा भेटी दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा घेवून गणित व विज्ञान विषयाचे ट्रीक्स देण्यात येतील.

2 ऑक्टोंबरला यात्रेचा शुभारंभ
भारत देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त गुजरात राज्यातील सोमनाथ मंदिरातून गांधी जयंतीला 2 ऑक्टोंबर 2021 रोजी रामानुजन अमृत भारत गणित यात्रा आरंभ झाली . या यात्रेचा समारोप 22 डिसेंबर 2021 रोजी महान भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी त्रिपुरा राज्यातील आगरतला येथे होणार आहे. 82 दिवस 25 राज्यांतील 75 शाळांमधे ही यात्रा भेट देणार आहे. या यात्रेसोबत संपूर्ण 82 दिवस गुजरातमधील मेहुलकुमार हरसोला व उत्तर प्रदेशातील ब्रजेश दिक्षीत आले आहेत.

यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
या यात्रेसाठी डी.पी.साळुंखे, जे.पी.सपकाळे, एन.ए.पाटील, जी.डी.चौधरी, डॉ.संजू भटकर, एस.एस.अहिरे, जीवन महाजन, योगेश इंगळे, समाधान जाधव, आर.बी.इंगळे, एम.आर.चौधरी, निलीमा पाटील, दिलीप बाविस्कर, तुषार बाविस्कर, वंदना भिरूड, अनिल माळी, डॉ.प्रा.भाग्यश्री भंगाळे, शैलेंद्रकुमार भंगाळे, धीरज चौधरी, एस.बी.कुळकर्णी, प्रदीप पसोनवणे, भूषण झोपे, प्रशांत नरवाडे, दिलीप जावळे, बापू चौधरी, राजेंद्र परसे आदी यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !