चाळीसगावात नवाब मलिकांचा पुतळा भाजपा पदाधिकार्यांनी जाळला
मंत्री मलिकांनी राजीनामा द्यावा : भाजपाची जोरदार घोषणाबाजी
चाळीसगाव : हसीना पारकर सोबत नवाब मलिकचे उघड झालेले संबंध, अंडरवर्ल्डची जमीन यांनी कवडीमोल भावाने खरेदी केल्याची बाब तसेच माफिया, दशहतवादी, राष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्याने चाळीसगावात भाजपा पदाधिकारी राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा पुतळा जाळून त्यांचा निशेध केला.
भाजपाची जोरदार घोषणाबाजी
नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के.बी.साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे, नगरसेवक चंद्रकांत तायडे, सोमसिंग पाटील, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, सरचिटणीस गिरीश बर्हाटे, डॉ.महेंद्रसिंग राठोड, कैलास पाटील, राहुल पाटील, कैलास गुजर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

