यावलला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेळावा


यावल : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वकील संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, यावल येथे आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्यास यावल, चोपडा, फैजपूरसह इतर भागातील हजारो नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिली व शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर शेकडो नागरीकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणही करून घेतले.

यावल तहसीलमध्ये कार्यक्रम
यावल येथील तहसील कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्यानिमित्त ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी, या शासकीय योजनांची महिती व लाभ सर्वसामान्यांना मिळावा, नागरीकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व्हावी या करीता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन न जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हाध्यक्ष विधी सेवा प्राधिकरण न्या.एस.डी.जगमलानी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.ए.ए.के.शेख, फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार एम.के.पवार, गटविकास अधिकारी विलास भाटकर, यावल तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन एम.एस.भारंचे, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील उपस्थित होते.

28 विभागांनी लावले स्टॉल
या ठिकाणी शासनाच्या महसुल, नगरपालिका, क्रीडा, महिला व बालविकास, कृषि, आरोग्य, ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, विविध राष्ट्रीयकृत बँका, आपत्ती निवारण कक्ष, जिल्हा पोलीस दल, वाहतूक शाखा, परीवहन विभाग, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभागासह इतर 28 विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले. या स्टॉलला भेट देणार्‍या नागरीकांना शासनाच्या योजनांची परिपुर्ण माहिती देण्यात येत होती. त्याचबरोबर पात्र लाभार्थींना आवश्यक दाखले त्याचठिकाणी देण्यात आले. या मेळाव्यात आरोग्य विभागामार्फत कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या महा कायदे विषयक शिबिराचा तालुक्यातील शेकडो नागरीकांनी लाभ घेतला. या मेळाव्यास विविध तालुकास्तरीय अधिकार्‍यांसह जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागातील शासकीय प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !