अंतुलीत मुक्ताई दिवाळी कर्तव्य माहेराचे सामाजिक कार्यक्रम


मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुली येथील माहेर असलेल्या सोनाली माणिकराव पाटील (सासरचे नाव दीपीका प्रकाशराव देशमुख) यांनी अनेक संकटांचा सामना करत गृहोद्योगात उंच भरारी घेतली व सूर्योदय गृह उद्योग, तेल्हारा येथे सुरू करून अनेक महिलांना रोजगार दिला. दीपिका पाटील यांना गृह उद्योगिका म्हणून अनेक पुरस्कार मिळाले असून आपण माहेरासाठी काहीतरी देणे लागतो या उद्देशाने त्यांनी अंतुली येथे ‘मुक्ताई दिवाळी कर्तव्य माहेराचे’ या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम अंतुली येथील मिठाराम फकीरा तराळ विद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला.

महिलांसह कोरोना योद्ध्यांचा सन्मान
या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त माहेरातील महिलांसाठी साडीचोळी देऊन सन्मान, कोरोना योद्धा सन्मान तसेच व्यावसायिक प्रशिक्षण व सत्कार मूर्ती गुरुवर्य माजी प्राचार्य एस.ए.भोई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांकडून विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय यांच्याकडून दीपिका व प्रकाशराव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जया भारती इंगोले यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, अंतुर्ली सरपंच सुलभा शिरतुरे, सत्कार मूर्ती माजी प्राचार्य एस.ए.भोई, विनोद तराळ, अंतुर्ली उपसरपंच गणेश तराळ, डॉ.प्रवीण देशमुख, शरद महाजन, अनिल वाडीले, बारी, अंकुश इंगळे, जया भारती इंगोले, अक्षय राऊत, वनिता कदम, सुधीर कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, निलेश लांडे, पवनराजे पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र स्टाफ, महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रकाशराव माधवराव देशमुख, हर्षा अविनाश वाकोडे आदींचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !