फैजपूर शहरात मोफत रुग्ण वाहिकेचे लोकार्पसण
फैजपूर : गरजु रुग्णांना वैद्यकीय मदत म्हणून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना अंगीकृत संघटना, शिक्षक सेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इलियास असगर शेख व त्यांच्या पत्नी मेहेर निगार शेख यांच्यातर्फे त्यांच्या स्व.आई-वडिलांच्या पुण्य प्राप्तीसाठी देण्यात आली. फैजपूर येथील सुभाष चौकात सर्व धर्माचें धर्मगुरु यांच्या उपस्थितीत लोकार्पण कार्यक्रम झाला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी मौलाना ताहेर पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना फतेह मोहम्मद, मौलाना अनस, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, मौलाना शौकत फलाही, मौलाना नोमान, केतन किरंगे, कलिम मेंबर, इरफान मेंबर, सय्यद असगर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कौसर शेख यांनी केले. कामील शेख, शरीफ शेख, अख्तर पहेलवान, आसीफ शेख, साबीर शेख आदींनी परीश्रम घेतले.


