रेल्वे प्रवाशांना दिलासा : विशेष उत्सव ट्रेनच्या अतिरिक्त फेर्‍या होणार


भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेर्‍या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी.चा संप सुरू असल्याने रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढल्याने त्यात अतिरीक्त गाड्यांमुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

अशा धावणार गाड्या
गाडी क्रमांक 03381 पाटणा-पुणे विशेष शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी, गाडी क्रमांक 03382 पुणे -पाटणा विशेष गाडी रविवार, 21 नोव्हेंबर, गाडी क्रमांक 05297 बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष शनिवार, 20 नोव्हेंबर रोजी, गाडी क्रमांक 05298 लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी विशेष सोमवार, 22 नोव्हेंबर रोजी धावणार आहे

या गाड्यांना मुदतवाढ
गाडी क्रमांक 04151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी 3 डिसेंबर ते 25 मार्चपर्यंत (प्रत्येक शुक्रवारी), गाडी क्रमांक 04152 लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी 4 डिसेंबर 2021 ते 26 मार्च 2022 (प्रत्येक शनिवारी). या विशेष गाड्यांची संरचना, थांबे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या विशेष गाड्यांमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणार्‍या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची व उतरण्याची परवानगी दिली जाणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !