फैजपूरात आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते विकासकामांचे उद्घाटन


फैजपूर : फैजपूर नगरपरीषद क्षेत्रातील नगर विकास निधी अंतर्गत विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत झाला.

या विकासकामांचे उद्घाटन
फैजपूरातील ताहा नगरातील गुलाम मौलाना यांच्या घरापासून ते उर्दू शाळेपर्यंत ट्रिमिक्स रस्त्याचे काँक्रिटीकरण, मिरची ग्राउंड भागात काँकिटीकरण, लक्ष्मी नगर परीसरात काँक्रिटीकरण, यावल रोडवरील वृंदावन कॉलनीत खडीकरण व काँक्रिटीकरण, न्हावी दरवाजापासून ते तडवी मशीदपर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण, ताहा नगरात इकबाल केलेवाले यांचे घरापासून ते जाफर सोड्यावाले यांचे घरापर्यंत व बशीर चखिवाले यांचे घरापर्यंत ट्रीमिक्स काँक्रिटीकरण आदी कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी फैजपूर नगराध्यक्षा महानंदा रवींद्र होले, उपनगराध्यक्षा नयना चंद्रशेखर चौधरी, गटनेते मिलिंद शंकर वाघुळदे, गटनेते कलीम खान, हैदर खान मण्यार, गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज खुशाल चौधरी, देवेंद्र बेंडाळे, केतन किरंगे, रशीद तडवी, नगरसेविका नफिसाबी इरफान, सायमा बी.मलक आबीद, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, इरफान मेंबर, आबिद सर, जी.पी.पाटील, दीपक होले, ठेकेदार कलीम खाटीक, संजय वाणी, रामराव मोरे, वसीम तडवी, फारुख शेख तसेच फैजपूर शहरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !