आग्रा महामार्गावर ट्रकने दुचाकीला उडवले : एक जागीच ठार तर दोघे जखमी
शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील नटवाडे फाट्यावर भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने पुढे चालणार्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात होवून महिला ठार झाली तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात हा रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास झाला.
ट्रकने उचाकीला उडवले
या अपघातात गदडदेव येथील शांतीबाई प्रताप पावरा (43) या जागीच मयत झाल्या तर प्रताप रेला पावरा व करण मिठ्या पावरा हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नटवाडे फाट्यावर भरधाव वेगाने जाणार्या ट्रक (क्रमांक एनएल 01-8828) वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या निष्काळजीपणाने ट्रक चालवून पुढे चालणार्या मोटरसायकल (क्रमांक एम.पी.46 एच.एच.7281) ला मागून जोरदार धडक तदली. या अपघातात शांतीबाई प्रताप पावरा (गदडदेव) या जागीच मयत झाल्या तर प्रताप रेला पावरा व कारण मोठ्या पावरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना महामार्ग अम्ब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन अपघात कलमान्वये अपघातास व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाधर सोनवणे करीत आहेत.


