प्रेमप्रकरणातून तरुणाला विष देवून ठार मारले : …या राज्यात घडली घटना


नवी दिल्ली : प्रेमप्रकरण तरुणाच्या जीवावर बेतले असून सुरूवातीला तरुणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली व नंतर तरुणाला विष दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा प्रकार ऑनर किलिंगचा मानला जात आहे. झारखंडच्या दुमकामध्ये ही घटना घडली. या भागात मेडिकल कॉलेजमध्ये शिकणार्‍या विवेक कुमार साह याचं एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. शेजारच्या गावात राहणार्‍या या मुलीचंही विवेकवर प्रेम होतं आणि दोघांनी लग्न करण्याची तयारी केली होती. प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्याही कुटुंबीयांना माहीत होती, मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

विष दिल्याने तरुणाचा मृत्यू
मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांच्याही घरच्यांना बोलावून घेत तरुणाला समज दिली होती. त्याच्याकडून सहीदेखील करून घेण्यात आली होती. या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेच्या दिवशी तरुणाला तरुणीच्या फोनवरून एक फोन आला. त्याला घरी बोलावण्यात आलं. घरी पोहोचल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
जेवणातून तरुणाला जबरदस्तीने विष देण्यात आलं. या अवस्थेत तरुण कसाबसा घरी पोहोचला आणि त्याने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. विवेकची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आता कुटुंबीयांनी केला आहे. मुलाला वेळेवर उपचार मिळाले असते, तर तो वाचू शकला असता, असा दावा विवेकच्या वडिलांनी केला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !