भुसावळात माजी विद्यार्थ्यांनी दिला 25 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा


भुसावळ : शहरातील डी.एल.हिंदी हायस्कूलमध्ये दहावी 1996-97 बॅचच्या स्नेह संमेलनात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. व्यासपीठावर हिंदी सेवा मंडळाचे ट्रस्टी ब्रिजमोहन अग्रवाल, सत्यनारायण गोडाले, महेशदत्तजी तिवारी, मधुलता शर्मा, बिशन अग्रवाल, नगरसेवक रमेश नागराणी, पंकज कुमार संड, श्यामदरगड तसेच शिक्षकवर्ग रमेश सोनार, युवराज पाटिल, मनोहर बर्‍हाटे, यशवंत वारके, पुखराज शर्मा, यु एम राणे, संजय शुक्ला, प्रबोध भावे, मयूर शहा, तसेच शिक्षिका सुनंदा सोनार, शोभा मंत्री, अनुसया भिरुड, भुसार, कुसूम सोनार, साधना रीसबुड, मृदुला हातवळणे, किरण पांडे उपस्थित होते.

25 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
उपस्थित ट्रस्टी व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन सपना नेमाणे आणि गणेश आंधळे यांनी केले तर प्रस्तावना प्रसन्न पांडे याने मांडली. विद्यार्थ्यांतर्फे मनोगत महेश कुलकर्णी, शिल्पा जाधव आणि हरीष भट यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी म्हणून भारतभर विखुरलेले सर्व माजी विद्यार्थी तब्बल 25 वर्षांनंतर एकत्र आले. अमित नाशिककर, किरण कदम, किशोर मिसाळ, संजय सोनार, हबीब चव्हाण, उमाकांत खंबायत, महेश कुलकर्णी, मनोज पाटील,स्मिता फुलझेले, शीतल वडे, रुपाली बर्गे, अपर्णा ताथोड, गजानन साठे, जितेंद्र विसपुते, निलेश खैरे, सुनील मराठे, सुनील सांगळे, विनोद निकम, सुनील दुसाणे, निलेश लवंगडे, शैलेंद्र मानकर, सचिन सगळे, प्रवीण नारखेडे, शिवाजी मोते, गिरीश फेगडे या सर्व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार रींकु बागडीयाने मानले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !