भुसावळात भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम


भुसावळ : शहरात थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती कल्याण आश्रम, भुसावळ व आदिवासी ठाकूर समाजाकडून साजरी करण्यात आली. या निमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. जामनेर रोडवरील भगवान बिरसा मुंडा चौकात ठाकूर समाजाचे अध्यक्ष गोपाळ ठाकूर, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे यांच्याहस्ते प्रतिमेला माल्यार्पण व दीपदान करून प्रतिमा पूजन करण्यात आले.

बिरसा मुंडा यांच्या इतिहासाने उपस्थित मंत्रमुग्ध
कल्याण आश्रमाचे उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी जनजाती समाज यांच्यावर ब्रिटिशांकडून होणार्‍या अत्याचाराला कसा लढा दिला व सनातन धर्म टिकवण्यासाठी प्राणाची आहुती दिली यावर भाष्य केले तर नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी ठाकूर समाजाने या आदर्श क्रांती विरांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. समाज अध्यक्ष गोपाळ ठाकूर यांनी बिरसा मुंडा यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास सर्वांसमोर ठेवला.

‘एक दिया बिरसा के नाम’ उपक्रम साजरा करावा
15 नोव्हेंबर हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणून यापुढे साजरा होईल, अशी घोषणा केली त्यामुळे जनजाती गौरव सप्ताह संपूर्ण राष्ट्रात साजरा होईल व त्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी बिरसा मुंडा जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजाति क्रांतीवीर व त्यांचे बलिदान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे व ‘एक दिया बिरसा के नाम’ उपक्रम सर्व घराघरांतून साजरा करावा, असे मत महिला सहप्रमुख अ‍ॅड.जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी कल्याण आश्रमाच्या अ‍ॅड.चित्रा आचार्य ,सचिव काशीराम बारेला, अ‍ॅड.जयश्री देशमुख, मधुकर वाणी, अ‍ॅड.वैशाली चौधरी, विरसिंग वसावे, अ‍ॅड.निलेश भंडारी, ठाकूर समाजाचे सुनील हिरामण ठाकुर, अविनाश ठाकुर, प्रमोद ठाकुर, विजय ठाकुर, उमेश ठाकुर, संजय ठाकुर, राजकुमार ठाकुर, प्रकाश ठाकुर, बापू ठाकुर, निलेश ठाकुर, सत्यविजय ठाकुर, भिकन ठाकुर तुषार ठाकुर, जगदीश ठाकुर, नामदेव ठाकुर, गिरीश ठाकुर, विलास ठाकुर, सचिन ठाकुर, अक्षय ठाकुर, जगदीश ठाकुर, हर्षल ठाकुर, दिनेश ठाकुर , प्रदीप सपकाळे, दीपक काढे, सचिन जाधव व नागरिक उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !