सामाजिक उपक्रमांनी भुसावळात बाळासाहेब ठाकरेंना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
भुसावळ : हिंदू हृदय सम्राट सरसेनापती तथा शिवसैनिकांचे आराध्य दैवत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहर व परीसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कट्टर शिवसैनिकांच्या वतीने बुधवार, 17 नोव्हेंबर रोजी शहरात विविध भागात गोरगरीब, गरजू लोकांना अन्नदान करण्यात येवून फराळ वाटप, ब्लँकेट वाटप व महिलांना साडी वाटपाचा कार्यकम झाला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास रेल्वे स्टेशन परीसर शिवभोजन केंद्राचे संचालक शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा), शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, मिलिंद कापडे, अबरार शेख, रईस खान, पीयुष शर्मा, रवी जगताप, रेहान कुरेशी, प्रा.विनोद गायकवाड, गोपाल दौलत हिंगने आदी शिवसैनिक उपस्थित होते.


