भुसावळ हत्याकांड : सूत्रधार समोर येवून शिक्षा होणारच
माजी मंत्री एकनाथराव खडसे : खरात परीवाराने केली सीआयडी चौकशीची मागणी
भुसावळ : भुसावळातील हत्याकांडात परीवारातील चार सदस्यांसह अन्य एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, 6 ारोजी घडली होती. या हत्याकांडामागील खर्या सूत्रधारापर्यंत पोचण्यासाठी सीआयडी चौकशी करावी तसेच मारेकर्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खरात परीवाराच्या सदस्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे केली. एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी खरात यांच्या निवासस्थानी जावून सांत्वन केले. हत्याकांड प्रकरणी तीन आरोंपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याने परीवारातील सदस्यांनी पोलिस यंत्रणेवर विश्वास ठेवावा, लवकरच या प्रकरणामागील खरे सूत्रधार समोर येतील, मारेकर्यांनाही न्यायालयीन प्रक्रियेनुसार शिक्षा होईल, या संपूर्ण प्रकरणाचा सीआयडीच्या माध्यमातून तपास होऊन खरात परीवाराला न्याय मिळेल, असा विश्वासही माजी मंत्री खडसे यांनी दिला. यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, गिरीष महाजन, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, भाजयुमोचे अनिकेत पाटील, परिक्षीत बर्हाटे आदी उपस्थित होते.
