भुसावळातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार : एकाविरोधात गुन्हा


भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवत शहरातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला मात्र विवाहास आरोपीने नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परमजितसिंग गील (शांती नगर, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

शहर पोलिसात गुन्हा

शहरातील 22 वर्षीय युवतीसोबत गील यांचा परीचय 2018 मध्ये या युवतीला लग्नाचे आमिष दाखविले. युवतीला युवकाने दोन-तीन ठिकाणी नेले मात्र युवतीने विवाह करण्याबाबत युवकाला विचारणा केली असता त्याने त्यास नकार देत जातीवाचक शिविगाळ केली. युवतीने या प्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून गील यांच्याविरूध्द अत्याचार व जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे हे पुढील तपास करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !