यावल फैजपूर रस्त्यावर अॅपे-क्रूझरचा अपघात : आठ जण जखमी
यावल : यावल-फैजपूर रस्त्यावरील सांगवी गावाजवळ क्रुझर-अॅपे रीक्षाची धडक होवून या अपघातात आठ जण जखमी झाले असून पाच जखमींना यावल ग्रामीण भागामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात रविवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला. बससेवा बंद असल्याने अॅपेरीक्षा चालक भरधाव वेगाने वाहतूक करीत असल्याने अपघात होत असल्याचा आरोप होत आहे.
अवैध वाहतुकीवर कारवाईची अपेक्षा
यावल-फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळ फैजपूर कडून यावल कडे पेरिक्षा (क्रमांक एम एच.19 सी.एफ. 0127) ही प्रवाशी घेवुन येत होती तर सांगवी गावातून भालोदकडे जाण्यासाठी क्रुझर (क्रमांक एम. एच. 19 ए.पी. 1407) ही जात होती. सांगवी जवळील चौफुलीवर अचानक या दोघा वाहनांची आपसात धडक झाली. या अपघातात आठ जण जखमी झाले. यातील दैलाबाई गुमान बारेला (39, रा. पारगाव, ता. चोपडा), शेख वसीम शेख रफिक (31, रा.सावदा), मंगलसिंग राजु बारेला (18), जगन भोगरा बारेला (42) व हिराबाई शिकदा बारेला (54, रा.चुंचाळे, गायरान, ता.यावल) अशा पाच जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ.निखील तायडे, अधिपरीचारीका ज्सोत्ना निंबाळकर, बापू महाजन, अमिन तडवी, अझरुद्दीन तडवी, रऊफ खान आदीनी प्रथम उपचार केले यातील दैलाबाई बारेला, शेख वसीम व मंगलसिंग बारेला यांना डोक्यास व हाता जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले आहे या अपघातातील तीन जखमींना घटना स्थळावरून खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले आहे. तर एसटी बसेसचा संप असल्याने लगबगीने प्रवाशी नेण्याच्या बेतात हा अपघात घडल्याचे प्रवाशांनी सांगितले.


