वरणगाव अतिक्रमित घरकुलासाठीची लागणारी मोजणी फी माफ करावी
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांची मागणी
वरणगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2022 पर्यंत सर्वांना घरे या उपक्रमातून वरणगाव शहरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून 912 घरकुले मंजूर आहेत मात्र सिदेश्वरनगरातील नागरीक हे वर्षानुवर्षे सिद्धेश्वर नगरात वास्तव्यास आहेत. या जागेवर घरकुल मंजूर असलेतरी मोजणी फी सहा लाख 94 हजार भरून मोजणी केल्याशिवाय घरकुलांच्या कामांना नगरपरीषदेला सुरवात करता येत नाही. भूमीअभिलेख विभागाने नगरपरीषदेने सहा लाख 94 हजार भरावे, असे सांगितले मात्र वरणगाव नगरपरीषदेकडे पैसे नसल्याने मंजूर घरकुले परत जाण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी निवेदन देत घरकुलासाठी लागणारी मोजणी फी माफ करावी, अशी मागणी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची भेट घेतली. सिदेश्वर नगर अतिक्रमणधारकांच्या जागेची लागणारी मोजणी फी सहा लाख 94 हजार रुपये जिल्हाधिकारी म्हणून विशेष बाब म्हणून भरावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी भाजपाचे शहरध्यक्ष सुनील माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, डॉ.प्रवीण चांदणे, साबीर कुरेशी, मिलिंद भैसे, बबलू शेख उपस्थित होते.


