ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार : …या गावात घडली घटना


शिरपूर : तालुक्यातील चाकडू येथे ट्रॅक्टर उलटल्याने त्या खाली दबले जावून चालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. जगन हाजमा पावरा (35, चाकडू, ता.शिरपूर) असे मयत चालकाचे नाव आहे.

ट्रॅक्टरखाली दबल्याने चालकाचा मृत्यू
चाकडू येथील सरपंच व ट्रॅक्टर मालक सुरेश आखाडे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडील स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरवर गावातील जगन हाजमा पावरा (35) हा चालक म्हणून कामास होता. सोमवारी तो चाकडू शिवारात गहाण केलेल्या वन जमीन क्षेत्रात कापूस पिकात मशागत काम करीत असताना चालकाने निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टर चालवल्याने ते उलटले व त्याखाली दबले जावून चालकाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत जगन पावरा यास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. चालक स्वतःच्या मृत्यूस व ट्रॅक्टरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक फुलपगारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !