‘जयभीम’ चित्रपट भुसावळात प्रसारीत व्हावा
रीपाइं आठवले गटाची प्रांताधिकारी प्रशासनाकडे मागणी
भुसावळ : भुसावळ शहर हे आंबेडकरी चळवळीचे माहेरघर असून शहरातील सिनेमागृहांमध्ये लोकप्रिय जयभीम चित्रपट प्रसारीत करण्यात यावा, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटातर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर येथे मागणीनुसार हा चित्रपट स्थानिक चित्रपटगृहांमध्ये प्रसारीत करण्यात आल्याने भुसावळातील चित्रपट गृहांमध्ये त्याचे प्रसारण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर लक्ष्मण जाधव, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, बाळा सोनवणे, प्रकाश सोनवणे, विश्वास खरात, सुनील ढिवरे, प्रकाश तायडे, नरेश गडवे, दीपक मोरे, शांताराम देशमुख आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान, शहरातील चित्रपटगृहांमध्ये जयभीम या लोकप्रिय चित्रपटाचे प्रदर्शन न झाल्यास लोकशाही मार्गाने पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशाराही पदाधिकार्यांनी दिला आहे.


