बोदवड पंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी होणार मतदान

राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर


मुंबई : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच धुळे, अहमदनगर, नांदेड-वाघाळा आणि सांगली-मिरज कुपवाड या चार महापालिकांमधील पोटनिवडणुकांसाठी व बोदवड (जळगाव) नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, संबंधित क्षेत्रात बुधवारपासून आचारसंहिता लागू केल्याचे निवडणूक आयुक्त यू पी. एस. मदान यांनी सांगितले.

22 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी
एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या 81 आणि डिसेंबर 2011 मध्ये मुदत संपणार्‍या 18 तसेच नवनिर्मित 6 अशा एकूण 105 नगरपंचायतींसाठी मतदान होईल. 1 ते 7 डिसेंबदरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर रोजी होईल.मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.



बोदवडमध्ये आखाडा तापणार
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय आखाडा गाजणार असल्याचे चिन्ह आहे. शहरात प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भूमिका येथे निर्णायक ठरणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !