रावेर तालुक्यातील जि.प.शाळा कुलूपबंद ठेवणार्‍या शिक्षकांवर होणार कारवाई

प्राथमिक शिक्षणधिकार्‍यांचे रावेर गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र


रावेर : ऑनलाईन शिक्षणाला खो देत रावेर तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांनी कुलूपबंद ठेवल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकारानंतर शिक्षण विभागाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत शालेय वेळेच पालन न करणार्‍या शिक्षकांवर कारवाईचे निर्देश रावेर गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्याने दांडी बहाद्दर शिक्षकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पालकवर्गातून भूमिकेचे स्वागत
कोरोना काळात जिल्हा परीषदेच्या शाळांवर शिक्षकांनी शाळेच्या दिलेल्या वेळेवर उपस्थित राहून मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश शासनाचे असतानाही रावेर तालुक्यातील काही शाळेतील शिक्षकांनी मात्र हे शासन आदेश बासनात गुंडाळल्याचा प्रकार उघड झाला होता. काही शांळाना भेटी दिल्यानंतर शाळेवर शिक्षक हजर नसताना चक्क कुलूप आढळले होते.

रावेर शिक्षण विभागाला पत्र
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विजय पाटील यांनी घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करावी, असे पत्र रावेर गटशिक्षणाधिकारी यांना पाठवले आहे. कुलूप बंद असलेल्या शाळा तसेच तालुक्यातील सर्व शाळांची चौकशी करून शिक्षक शाळेवर येतात किंवा नाही याची चौकशी करून शिक्षकांना शालेय वेळेबाबत काटेकोर पालन करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच वेळेचे पालन न करणार्‍या शाळा व शिक्षकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने दांडी मारणार्‍या शिक्षकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !