जळगावातील वयोवृद्धाची 62 लाखात फसवणूक : दिल्लीतील ठग सायबर पोलिसांच्या जाळ्यात


जळगाव : विमा कंपनीत पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून गुंतवलेले पैशांचा परतावा परत देण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील विद्युत कॉलनीतील टिकाराम शंकर भोळे (88( यांची 61 लाख 79 हजारात ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जळगाव सायबर पोलिसांनी दिल्लीतील दोन संशयितांना अटक केली. दोघा संशयितांना अटक करून सायबर पोलिसांनी गुरुवार 25 नोव्हेंबर रोजी जळगाव गाठले. जिल्हा न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली. अमितसिंग देवेंद्र प्रकाशसिंग उर्फ पिता मुलचंद शर्मा (रा.मोतीराम रोड, मानसरोवर पार्क, शाहदरा नार्थ ईस्ट दिल्ली) व लखमी चंद राजेशकुमार (जोहरी पूर, दिल्ली) अशी अटकेतील दोघा संशयीतांची नावे आहेत.

सायबर पोलिसात दाखल होता गुन्हा
सेवानिवृत्त कर्मचारी टिकाराम शंकर भोळे यांची नोव्हेंबर 2017 ते दि. 25 ऑक्टोंबर 2021 पर्यंत वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करुन दीपक शर्मा, अनुराम शर्मा व कमलाकरन रेड्डी असे वेगवेगळी नावे सांगून 61 लाख 79 हजार 593 रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली होती. याप्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





आरोपी निष्पन्न होताच घातल्या बेड्या
सायबर पोलिसांनी भोळे यांना आलेले ईमेल, फोन कॉल व त्यांनी रक्कम ज्या खात्यांवर पाठविली त्यांचा अभ्यास केला असता, त्यांना फसवणुक करणारे हे दिल्ली येथील असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे व सचिन सोनवणे यांनी संशयतिंच्या बँक खाते व इतर माहितीचा तांत्रिक दृष्ट्या माहिती काढुन संशयितांचा पत्ता व नावे निष्पन्न केली.

यांनी केली आरोपींना अटक
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, पोलीस उपनिरीक्षक अंगत नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, पंकज वराडे, दीपक सोनवणे, श्रीकांत चव्हाण, सचिन सोनवणे यांच्या पथकाने दिल्ली येथून दोन संशयीतांना अटक केली. संशयितांनी महाराष्ट्रासह भारतात अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !