मराठी गझलेचा खान्देशात उमटला ठसा

मराठी भाषेचे संवर्धनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद : कैलास कडलग


रावेर : खान्देशातील पहिले राज्यस्तरीय गझल वैदर्भी रावेरात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुशायरा एकचे संमेलन अध्यक्ष व महाराष्ट्र अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष, प्रसिद्ध कवी प्रा.हिम्मत ढाळे होते. उद्घाटन सेवानिवृत्त अभियंता डॉ.प्रमोद काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमा पूजन प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे, रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे, उद्योजक श्रीराम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप अग्रवाल, समाज अध्यक्ष संजय अग्रवाल, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, प्रा.डॉ.पी.व्ही.दलाल, सतीश जामोदकर, प्रा.संजय कावरे, कामगार नेते दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष चंद्रशेखर भुयार यांनी केले. संमेलनात दिलीप कांबळे, रमेश पाटील, पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

मातृभाषेला जपण्यासाठी असे कार्यक्रम हवेत
प्रांताधिकारी कैलास कडलग भाषणात म्हणाले की, मातृभाषेला जपण्यासाठी या सारखे कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. भुयार आणि सर्व गझलकार मंडळी यांचे कौतुक केले पाहिजे आणि त्यांच्या या मराठी जतनाच्या कार्याला आपण देखील हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.प्रमोद काकडे यांनी देखील खान्देशातील या पहिल्या संमेलनाच्या आयोजनाचे कौतुक केले. हिंमत ढाळे यांनी अध्यक्षीय भाषणात मराठी गझल विषयी सविस्तर माहिती देऊन बहिणाबाईंच्या खान्देशातील कवींचा गौरव देखील केला. सूत्रसंचालन दीपक नगरे तर आभार डॉ.संदीप पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात रावेर येथील हिंदी कवी अरमान रावेरी यांनी मान्यवरांना इंसानियत या विषयावरील काव्य संग्रह भेट दिला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !