खिर्डी खुर्द येथील व्यापार्यांकडून ग्रामपंचायतीला शीत शवपेटी भेट
खिर्डी : खिर्डी येथील व्यापार्यांनी शेख कमर शेख हसन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ग्रामपंचायतीला शनिवारी शीत शवपेटी भेट दिली. खिर्डी येथील दानशूर व केळी, कापूस व धान्य व्यापारी शेख इम्रान तसेच त्यांचे भाऊ शेख रईस, शेख फारूक, शेख फरीद, शेख इरफान, शेख मोसीम, शेख आमीन यांच्या वतीने शनिवारी शीत शवपेटी खिर्डी खुर्द ग्रामपंचायतीला भेट देऊन तिचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, अडचणीच्या काळात ग्रामपंचायतीतून शीतपेटी उपलब्ध होणार असल्याचे सरपंच राहुल फालक म्हणाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास खिर्डी खुर्द येथील सरपंच राहुल फालक, उपसरपंच पुष्पाबाई पाटील, ग्रामविकास अधिकारी गोकुळ सोनवणे, सदस्य ज्योती कोळी, सुषमा महाजन, अनिस बी.पिंजारी, उज्वला लढे, जयश्री कोचुरे, प्रवीण बढे, सतीश फेगडे, रवींद्र कोचुरे, प्रवीण चौधरी तसेच माजी उपसरपंच अलताफ बेग, नीळकंठ बढे, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, विलास पाटील, साबीर बेग, याकूब बेग, जाबीर बेग, साजीद खान, दुर्गादास बोंडे, शेख कय्युम, राजू महाजन, प्रल्हाद कोचुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


