भुसावळ शहरात बुधवारी ई-श्रम, आरोग्य कार्ड नोंदणी
भुसावळ : शहरातील प्रभाग दहामधील नागरीकांसाठी बुधवार, 1 डिसेंबर रोजी महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा रेल्वे सल्लागार समितीचे माजी सदस्य अनिकेत पाटील यांच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड, डिजिटल आरोग्य कार्ड आणि ज्येष्ठ नागरीक कार्ड नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान विठ्ठल मंदिर, व्हीएम वॉर्डात हे शिबिर होईल. त्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या हस्ते होईल. लाभ घ्यावा, असे आवाहन अनिकेत पाटील यांनी केले आहे.