सावदा येथे घरोघरी जाऊन लसीकरण

प्रत्येकाने लस घेण्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे आवाहन


सावदा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत डॉ.प्रसाद पाटील व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वाड्या, चौकात लसीकरणासाठी सोमवार, 8 नोव्हेंबरपासून ‘हर घर दस्तक अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाला लसीकरण लाभार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील ज्या नागरीरकांनी अद्यापपावतो कोणतेही कोविड 19 बाबत लसीकरण करून घेतलेले नाही अश्या 18 वर्षावरील नागरीकांनी हर घर दस्तक मोहिमेंतर्गत लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना लस घ्यायची असेल त्यांनी लसीकरणासाठी फिरते पथक आपल्या दरी येत असून त्यात लस घ्यावी तसेच पहिला डोस घेऊन कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींनी त्वरीत दुसरा डोस घ्यावा.

लसीकरणासाठी यांचे परीश्रम
लसीकरणाकरीता डॉ.उपासना तायडे, डॉ.दीपिका ओक, डॉ.निलीजा पाटील, फार्मासीस्ट दीपक कोष्टी, जे.बी चौधरी, दीपिका कोल्हे, लक्ष्मी धनगर, सविता धनगर, शकुंतला पाल, मनोज वाघ, मनोज धुंधले, संदीप पाटील, विशाल बावस्कर, महेश इंगळे, हेमलता भंगाळे, सविता धनगर, मनोज, गौरव, तडवी हे कामगिरी बजावत आहे. नागरीकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !