मॉर्निंग सीसी चषक नितीन इलेव्हनने पटकावले
साकेगाव शहरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात
भुसावळ : शहराजवळील साकेगाव येथे महामार्गालगत असलेल्या जिल्हा परीषद शाळेच्या मैदानावर आयोजित मॉर्निंगचा चषक नितीन इलेव्हन संघाने पटकावला. गावातील खेळाडूंनी तयार केलेला मॉर्निंग सीसी क्लबमध्ये सर्व संघाचे खेळाडू दररोज सराव करतात. येत्या सरपंच चषकाची तयारी म्हणून विविध संघातील एकत्रीत खेळाडूंनी तीन संघात विभागणी करून स्पर्धेत सहभाग घेतला. मॉर्निंग चषक क्रिकेट स्पर्धेत पहिला सामना डॉ.दीपक इलेव्हनविरूद्ध पवन इलेव्हन यांच्यात झाला. हा सामना पवन इलेव्हन संघाने जिंकला. दुसरा सामना पवन इलेव्हनविरुद्ध नितीन इलेव्हन यांच्यात झाला. या सामन्यातही पवन इलेव्हन विजयी ठरला तर तिसरा सामना सुपर ओवर खेळविण्यात आले. यात डॉ.दीपक इलेव्हन संघावर नीतीने इलेव्हन संघावर वर्चस्व राखत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना पवन इलेव्हन वर्सेस नितीन इलेव्हन यांच्याविरुद्ध झाला हा सामना नितीन इलेव्हनने जिंकत मॉर्निंग सीसी चषक पटकाविला.
यांचे स्पर्धेकामी लाभले सहकार्य
स्पर्धेचे आयोजक मॉर्निंग सीसीतर्फे डॉ.दीपक पाटील होते. यासाठी नितीन पाटील, डॉ.कैलास ठाकरे, पप्पू राजपूत, आनंद ठाकरे, वासेफ पटेल, रमजान पटेल, अजय चौधरी, संतोष पाटील, राहुल चौधरी, विष्णु सोनवणे, विनोद परदेशी, धनराज भोई यांचे सहकार्य लाभले. विजयी संघाला विनोद परदेशी यांच्यातर्फे तर उपविजेत्या संघाला विष्णू सोनवणे यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन योगेश योगेश पाटील व बेस्ट बॉलर गोलू अहिरे यास अजय चौधरी यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आली.
स्पर्धेत पंच म्हणून पप्पू पटेल, प्रवीण पाटील यांनी गुणलेखक म्हणून अजय चौधरी तर समालोचक म्हणून रमजान पाटील तर मॅच रेफ्री म्हणून वासेफ पटेल यांनी काम पाहिले. हेमंत कोळी यांनी साऊंड सिस्टिम देऊन सहकार्य केले तसेच स्पर्धेसाठी मॉर्निंग सीसीच्या सर्व खेळाडूंनी परीश्रम घेतले.


