भुसावळ शहरासह तालुक्यात शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

एस.टी.संपामुळे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली : सोमवारनंतर वाढणार उपस्थिती


भुसावळ : कोरोना कारणास्तवर बंद झालेल्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या असल्यातरी पहिल्याच दिवशी शहर व ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची नगण्य उपस्थिती होती. शहरी भागात बंद असलेेले इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील इयत्ता पहिले ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मास्क लावून तसेच हातावर सॅनिटायझर देवून वर्गात प्रवेश देण्यात आला. एस.टी.चा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र शहरात येऊ शकले नाहीत.

एस.टी.संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल
बुधवारपासून शहरी भागात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या व ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू झाले खरे मात्र एस.टी.संपामुळे तालुक्यातील शाळेत शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल झाले तर स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांची कोरोनामुळे नगण्य उपस्थिती दिसून आली. ग्रामीण भागातून दुसरीकडे रीक्षेचे भाडे थेट दुप्पट झाले असून अनेकांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणून सोडले. विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनींग करण्यात आली. मास्क व सॅनीटायझेशन सोबतच काही अंशी फिजीकल डिस्टंन्सींगचे नियमही पाळले गेले मात्र शहरात कोणत्याही शाळेत वैद्यकिय मदत कक्ष आढळून आला नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !