दोन गावठी कट्ट्यांसह आरोपी जाळ्यात

शिरपूर तालुक्यात धुळे गुन्हे शाखेची धडक कारवाई


धुळे/शिरपूर : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथून चार जिवंत काडतूस व दोन गावठी कट्ट्यासह एकास अटक केली. शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे मध्यप्रदेशातील व्यक्ती गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना शनिवारी सकाळी मिळल्यावरून एलसीबीच्या पथकाने शोध घेतला असता वाघाडी गावातील वाडी रस्त्यावरील अश्विनी बिअरबार समोर रस्त्यावर संशयीताला अटक करण्यात आली. सुखराम रेतम पवार (23, रा.मु.पो. रायचुल, ता. पानसेमल जि. बडवाणी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किंमतीच्या चार काडतुस व मोबाईल असा 57 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एलसीबीचे महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पीएसआय योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संदीप सरग, चव्हाण, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, तुषार पारधी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !